मराठीतील अष्टपैलू अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीवरही आपली छाप पाडणारे सचिन पिळगावकर यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राजगड येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनसेच्या चित्रपट विभागाचे उपाध्यक्षपद स्वीकारले.
सचिन पिळगावकर यांच्या हस्ते यावेळी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता संजय नार्वेकर, संजीव देशपांडे यांना मनसे चित्रपट विभागाच्या उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
खोपकर म्हणाले की, सचिन पिळगावकर यांचे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अभूतपूर्व योगदान लाभले आहे. त्यांना चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान आहे. या क्षेत्रात आणखीण भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी मनसेत येण्याची इच्छा दर्शविली. त्यांच्या याच इच्छेचा मान राखून आम्ही सचिन यांचे मनसेत स्वागत करीत आहोत.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे पक्ष त्यांचा चित्रपट विभाग मजबूत करण्यावर भर देत असून, अभिनेता सचिन यांची नियुक्ती हे त्यादृष्टीने उचलेले महत्वाचे पाऊल समजले जात आहे. पिळगावकर यांचे मनसेतील आगमन हे शिवसेना चित्रपट विभागाचे नेतृत्व करत असलेल्या अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासाठी कडवे आव्हान असण्याची शक्यता आहे.
सचिन पिळगावकर यांचा ‘मनसे’त प्रवेश!
मराठीतील अष्टपैलू अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीवरही आपली छाप पाडणारे सचिन पिळगावकर यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला.
First published on: 10-12-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar joins maharashtra navnirman sena cinema wing