फर्स्ट लूक आणि ध्वनिफित प्रकाशन सोहळ्याला चित्रपटाशी संबंधित कलाकार हजर राहणे अत्यंत स्वाभाविक आहेच, पण त्याव्यतिरिक्त हजर राहणाऱ्या चेहऱ्यांची विशेष दखल घ्यायला नको का… ‘सांगतो ऐका’च्या सोहळ्यातील इतक उपस्थितांवर आपण थोडासा प्रकाश टाकून पाहू या. रिमाची उपस्थिती लक्षणीय होती. आजच्या पिढीतील काही कलाकारानी रिमाला वाकून नमस्कार करीत तिचा आदर केला. गंभीर प्रकृतीचा अशोक सराफ आपला मित्र सचिन पिळगावकरसाठी खास हजर होता. श्रेयस तळपदे कुठेही गेला तरी भाव खावून जातो. तो आपली पत्नी दीप्तीसोबत आला. मनिषा केळकर अत्यंत ग्लॅमरस रुपात आली आणि सहजतेने वावरली, श्रुती मराठेच्या वागण्यातील वाढलेला आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. हेमांगी कधी खूप उत्साहाने अनेक गोष्टीना दाद देत होती. कलाकारांच्या या मांदियाळीत पुष्कर श्रोत्रीही लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला. सचिनचे जुने मित्र सतिश शहा आणि अली अझगर हेदेखिल हजर राहिले. काही नवतारकाही लक्ष वेधत होत्या. एकूण काय, फिल्मी सोहळ्यातील अशी आजूबाजूची मंडळीही महत्वाची असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा