पूर्वी चित्रकलेच्या माध्यमातून चित्रपटांच्या पोस्टर्सला एक वेगळेपण मिळत होतं… पुढे बरेचसे बदल सिनेसृष्टीत होत गेले आणि पोस्टर रंगवणाऱ्या हातांची जागा कॉम्प्युटरच्या माऊसने घेतली आणि सगळंच आधुनिक झालं. या आधुनिकतेतून कला कुठेतरी विस्मरणात गेली. याच कलेला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने तोच नॉस्टॅल्जया पुन्हा निर्माण करत ‘रणांगण’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोस्टर डिझायनर सचिन गुरव यांच्या कलात्मकतेतून साकारलेल्या या पोस्टरवर संभ्रमात पडलेले सिध्दार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरे सर्वांचच लक्ष वेधतात. तर स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांच्या डोळ्यातला रोष रणांगणात सुरू होणाऱ्या युध्दाची जाणीव करून देत आहे. या पोस्टरची जमेची बाजू म्हणजे याने निर्माण केलेला एलपीजच्या युगातला तोच नॉस्टॅल्जिया.

आपल्या प्रमोशनदरम्यान सातत्याने वेगळेपण जपत आलेला ‘५२ विक्स एंटरटेनमेंट’ निर्मित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत रणांगण या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली असून सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

कॉम्प्युटरच्या युगात लाँच झालेल्या या रंगीत पोस्टरने मोठमोठ्या एलपीजच्या कव्हर्सची आठवण करून दिलेला ‘रणांगण’ हा चित्रपट नात्यांची खरी बाजू मांडण्यासाठी येत्या ११ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar swapnil joshi starrer marathi movie ranagan new poster released