चित्रपट बनवणे खरं तर एक सर्वात अवघड अशी कला आहे. यात अनेकजण एकत्र येऊन काम करत असतात. तंत्रज्ञ, कलाकार मंडळी या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाला खरं तर कॅप्टन ऑफ द शिप असेही आपल्याकडे म्हणतात. चित्रपटसृष्टीत आजवर अनेक महान दिग्दर्शक होऊन गेले आहेत. ज्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही तर जगण्याची दिशा देऊन गेले.

हिंदीत जसे हृषिकेश मुखर्जी, रमेश सिप्पी, बिमल रॉय अशी मंडळी तर मराठीमध्ये राजा परांजपे, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर अशी मातब्बर मंडळी होती. याच दिग्दर्शकांच्या तालमीत तयार झालेले आजचे आघाडीचे दिग्दर्शक अभिनेते गायक नर्तक अशा अनेक भूमिका करणारे नट म्हणजे सचिन पिळगावकर, आजच्या लेखात आपण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा जाणून घेणार आहोत..

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे

“एकीकडे वेदना होत असताना दुसरीकडे मात्र…” शरद पोंक्षे यांनी शेअर केली खास पोस्ट

सुबोध भावे या अभिनेत्याने पहिल्यांदा चित्रपट दिग्दर्शनाचा घाट घातला होता. तो स्वतः काम करत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा चित्रपट बनावा अशी त्याची इच्छा होती. सुबोधने चित्रपटाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. हळूहळू एक एक जण त्याला सापडत गेला. तंत्रज्ञ मंडळी ठरली कलाकार ठरत नव्हते. यातील एक अजरामर पात्रासाठी सुबोधला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. ते पात्र म्हणजे खांसाहेब. ‘वसंतराव देशपांडे’ नाटकात ही भूमिका करायचे. मात्र चित्रपटासाठी कोणता अभिनेता घ्यावा या पेचात सुबोध भावे पडला होता.

सचिन पिळगावकर नव्हे तर खेडेकर करणार होते भूमिका :

सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेने चर्चेत आलेले अभिनेते ‘सचिन खेडेकर’ खांसाहेबांची भूमिका करणार होते. सुबोधने सुरवातीला सचिन खेडेकरांना ही विचारण्यात आली होती. त्यांनी देखील होकार कळवला होता. मात्र तारखांचा घोळ झाला आणि सचिन खेडेकरांना ही भूमिका करता आली नाही. आता या भूमिकेसाठी सुबोधने पुन्हा एकदा शोधमोहीम सुरु केली. हिंदीतले प्रसिद्ध अभिनेते ‘बोमन इराणी’ यांना विचारण्यात आले, मात्र त्यांची इच्छा होती हा चित्रपट ‘हिंदीत’ व्हावा, मात्र हिंदीत चित्रपट करणे शक्य नसल्याने विषय इथेच थांबला. हिंदीमधल्या आणखीन एक अभिनेत्याला विचारण्यात आलं तो अभिनेता म्हणजे ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ मात्र त्याने देखील कळवतो हे एवढेच सांगितले. सुबोधला अमिताभ बच्चन, कमल हासन ‘-सारख्या अभिनेत्याना या भूमिकेसाठी घ्यावे असे वाटत होते.

अनुराग कश्यपने शेअर केला पूर्वश्रमीच्या पत्नींचा फोटो, म्हणाला “दोघीही माझ्या…”

खांसाहेबांच्या भूमिकेसाठी काही केल्या गणित जुळून येत नव्हते. अखेर मित्रच मित्राच्या कामी येतो. दिग्दर्शक ओम राऊत सुबोध भावे हे दोघे मित्र. ओम राऊत यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना ओमनेच सुबोधला सल्ला दिला की तू सचिनजींना का नाही विचारत? सुबोधला आधी हे नाव सुचले होते पण या भूमिकेत ते योग्य दिसणार नाहीत अशी त्याची समजूत होती. मात्र ओमच्या सल्ल्याने त्याच्याच ऑफिसमधून सुबोधने सचिन यांना फोन लावला, सचिन यांना त्याला भेटायला बोलवले. सचिनजी देखील या भूमिकेच्या बाबती साशंक होते मात्र मेकअपमन विक्रम गायकवाड यांनी सचिन यांना लूक टेस्ट केली. लुकटेस्टमध्ये त्यांना गेटअप आवडला.त्यांनी ही भूमिका करण्यास होकार दिला आणि इथूनच चित्रपटाची गाडी पुढे सरकली आणि इतर कलाकारांची निवड करण्यात आली.

‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने पुन्हा एकदा शास्त्रीय संगीताला वेगळी ओळख निर्माण करून दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी देखील तो डोक्यावर घेतला. सुबोध भावेच्या प्रयत्नांना यश मिळाले. हा किस्सा खुद्द सुबोध भावेने त्याच्या ‘घेई छंद’ या पुस्तकात लिहला आहे. चित्रपटातील अथवा नाटकातील व्यक्तीरेखा कोणता अभिनेता साकारणार यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात हे मात्र नक्की..