बॉलीवूडमध्ये पदार्पण आणि तेही शाहरुखसोबत असेल तर एखाद्या कलाकाराचे भाग्यचं चमकले असे म्हटले जाते. असेच काहीसे श्रिया पिळगावकरबाबत म्हणावे लागेल. सुप्रसिद्ध अभिनेता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर बॉलीवूड बादशाहा शाहरुखसोबत ती झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाद्वारे श्रिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जातेय. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत सुरु असून शाहरुख आणि श्रिया हे दोघेही तेथे शूटींग करत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. श्रियानं २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एकुलती एक’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Story img Loader