भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही लोकप्रिल स्टारकिड्सपैकी एक आहे. साराचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सारा सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साराच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीची लेक अलाविया जाफरी देखील दिसत आहे. सारा आणि अलाविया रॅपर एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टमध्ये मस्ती करत असल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. तिथलाच हा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सारा आणि अलाविया या दोघी ‘ब्राउन मुंडे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. असे म्हटले जाते की अलाविया पहिलीत असल्यापासून मैत्रिणी आहेत.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

दरम्यान, या पार्टीत सारा तेंडुलकरसोबतच सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि जान्हवी कपूर हे उपस्थित होते. साराने नुकतीच मॉडेलिंग करत ग्लमरच्या दुनियेत पदार्पण केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar daughter sara groove to brown munde in rapper ap dhillon concert watch video dcp