मागच्या काही काळापासून सेलिब्रेटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. आगामी काळात शनाया कपूर, सुहाना खान, इब्राहिम अली खान, पलक तिवारी, अगस्त्य नंदा यांसारखे सेलिब्रेटी किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या यादीत आता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाचाही समावेश झाला आहे. मागच्या काही वर्षांपासून साराचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता एका बॉलिवूड रिपोर्टनं चित्रपटामध्ये विशेष रुची असलेली सारा लवकरच बॉलिवूड पदार्पण करू शकते असा अंदाज वर्तवला आहे.

बॉलिवूड लाइफनं दिलेल्या वृत्तानुसार, साराच्या जवळच्या सूत्रांनी सारा आगामी काळात बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे. लवकरच ती बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सारा तेंडुलकरला अभिनय क्षेत्रात बरीच रुची आहे. एवढंच नाही तर तिनं अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं आहे. ती काही नामांकित ब्रँडसाठी जाहिराती देखील करते. सारा सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत आहे. मात्र २४ वर्षीय साराला ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर करायचं आहे.’

आणखी वाचा- “आर माधवनचा मुलगा म्हणून नाही तर…” सुवर्ण पदक जिंकल्यावर वेदांतचं मोठं वक्तव्य

सूत्रांनी सांगितलं की, ‘साराच्या अभिनयाबाबत फारसं कोणाला माहीत नाही कारण याआधी कोणी तिला अभिनय करताना पाहिलेलं नाही. त्यामुळे तिला अभिनय करताना पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. ती खूपच टॅलेंटेड आहे आणि तिला तिच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा आहे.सारा एक प्रोफेशनल मॉडेल असून तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेतही असतात.’ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या साराचे इन्स्टाग्रामवर १८ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

आणखी वाचा- “लहान असताना एक मुलगा मला…” लैंगिक शोषणाबाबत कंगना रणौतचा Lock Uppमध्ये धक्कादायक खुलासा

दरम्यान काही वर्षांपूर्वी सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी सचिन तेंडुलकरनं स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यावेळी सचिन म्हणाला होता, “सारा सध्या तिचं शिक्षण घेत आहे आणि आयुष्य एन्जॉय करत आहे. बॉलिवूड पदार्पणाच्या बातम्या ऐकल्यावर ती खूप नाराज आहे. सध्या तरी तिचा बॉलिवूड पदार्पणाचा कोणताही विचार नाही.” अशात आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याची पुष्टी स्वतः सारानं अद्याप केलेली नाही.

Story img Loader