वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ अभिनेत्री कुब्रा सैतचं पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ अलिकडेच लॉन्च झालं. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने तिच्यासोबत झालेल्या शारीरिक शोषणपासून ते बॉडी शेमिंगपर्यंत सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर तिने तिच्या प्रेग्नन्सीबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ मधील एका चॅप्टरमध्ये कुब्रा सैतनं २०१३ साली एका वन नाइट स्टँडनंतर ती प्रेग्नंट झाल्याचं म्हटलं आहे. या प्रेग्नन्सीनंतर तिला गर्भपात करावा लागला होता. त्यावेळी कुब्रा ३० वर्षांची होती. कुब्रानं या पुस्तकात सांगितलं की, हे सगळं घडलं तेव्हा ती अंदमान ट्रिपवर होती. त्या ठिकाणी ड्रिंक केल्यानंतर आपल्या एका मित्रासोबत ती इंटिमेट झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती.

आणखी वाचा- “आता आम्ही न घाबरता…” एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पोस्ट चर्चेत

आपल्या आयुष्यातील या घटनेबद्दल बोलताना एका मुलाखतीत कुब्रा म्हणाली, “जेव्हा मला हे समजलं तेव्हा एका आठवड्यानंतर मी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. पण ज्याची मी कल्पना केली होती तसं काहीच नव्हतं. एक माणूस म्हणून मी त्यावेळी यासाठी तयार नव्हते. आजही मी आई होण्यासाठी तयार नाहीये. वयाच्या २३ व्या वर्षी लग्न आणि मग ३० व्या वर्षी आई होणं हे माझ्याकडून होणार नाही. मी त्यावेळी यासाठी तयार नव्हते हे मला माहीत होतं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही.”

आणखी वाचा- “ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाला…” प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

कुब्रा सैतनं तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिची खूपच छोटीशी भूमिका होती. त्यानंतर तिने ‘जवानी जानेमन’, ‘सुल्तान’, ‘सिटी ऑफ लाइफ’ या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मात्र ओटीटी वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मधूनच मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sacred games actress kubra sait got pregnant after one night stand mrj