मनोरंजन क्षेत्रातील कलाकार जसे पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकतात तसेच ते सामाजिक कार्यासांठी ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये सोनू सूद, अक्षय कुमार, सलमान खान हे अभिनेते कायमच सामाजिक कार्यांमध्ये हातभार लावत असतात. मराठीत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली होती. त्याचबरोबरीने मराठमोळी अभिनेत्रीदेखील सामाजिक कार्य करत असते.

‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री राजश्री देशपांडे कायम चर्चेत असते. नुकतीच ‘ट्रायल बाय फायर’ही तिची वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. ज्यात तिने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले तसेच सामाजिक कार्याबद्दलदेखील सांगितले आहे, महिलांच्या समस्यांसाठी तिने काम केले आहे. ती असं म्हणाली, “मी मराठवाड्यातून आले आहे, आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी मला माझ्या पालकांना मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी जाण्यासाठी पटवून द्यावे लागले.”

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

“तुम्हीपण बोल्ड आहात…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये हॉट सीन्स देणाऱ्या राजश्री देशपांडेचं वक्तव्य

पुढे ती म्हणाली, “मी कायद्याची पदवी संपादन केली. आमच्या भागात मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न लावले जाते अशी प्रथा आहे. पण मला ही परंपरा मोडायची होती. लहानपणापासूनच मी नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचे. यासोबतच मला समाजसेवेचीही आवड होती. काश्मीर पूर, उत्तराखंड भूकंप यांसारख्या आपत्तींमध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम केले. प्रथम मी एक गाव दत्तक घेतले, जिथे मी पाणी आणि महिलांचे शिक्षण, आरोग्य, स्वच्छतागृहे या विषयांवर काम करू लागले. मी माझ्या मराठवाड्यापासून कामाला सुरवात केली. कारण मला त्यांच्या समस्यांची जाणीव आहे. आज मी तीस गावांतील महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

राजश्री मूळची औरंगाबादची, तिचा लहानपणापासून रंगभूमीकडे ओढा होता. तिने पुण्यातुन आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या करियरची सुरवात तिने नाटकांपासून केली. नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिज मध्ये तिने काम केले होते. तिने या वेबसीरिज मध्येखूप बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या या बोल्ड सीन्सची चर्चा रंगली होती.

Story img Loader