वेब सीरिजच्या विश्वात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ या भूमिकांनी इतिहास घडवला. या भूमिका जितक्या लोकप्रिय आहेत तितक्याच त्यांच्या वेब सीरिजही. नेटफ्लिक्सची ‘सेक्रेड गेम्स’ आणि अॅमेझॉन प्राइमची ‘मिर्झापूर’ या दोन्ही क्राइम थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेब सीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत.

स्कोर ट्रेंड्सच्या आकड्यांनुसार, सेक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी मिर्झापूर ही मालिका आहे. आर. माधवन आणि अमित साधची मुख्य भूमिका असलेली अॅमेझॉन प्राइमची ‘ब्रीद’ वेब सीरिज तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सयानी गुप्ताची मुख्य भूमिका असलेली ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय- मोना सिंगची ‘कहने को हमसफर है’ पाचव्या स्थानी आहे.

‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझनसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजीटल आणि व्हायरल न्यूजमध्ये या दोन्ही वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी दिलेली आहे.

लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी स्थानी असलेली सेक्रेड गेम्स ही मालिका डिजीटल न्यूज, वृतपत्र आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर मिर्झापूरने डिजीटल न्यूज़, सोशल आणि व्हायरल न्यूज़ श्रेणींमध्ये चांगला स्कोर केलाय. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. तर ऑल्ट बालाजीची ‘कहने को हमसफर है’ने गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून सगळ्यांना आश्चर्यचकीत केलंय.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “आम्ही वेब सीरिज आणि त्यातले कलाकार यांना स्कोर ट्रेंड्सव्दारे ट्रॅक करायला सुरूवात केल्यावर आम्हांला दिसून आलं, की वेब मालिकांची सध्या सोशल, व्हायरल बातम्या, डिजीटल बातम्या और वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रियता आहे. नुकतीच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ मालिकाही स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर खूप लोकप्रिय होतेय.

Story img Loader