अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फीटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने झहीर- सागरिकाच्या लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर होताच अगदी थोड्या वेळात तो व्हायरल व्हायलाही सुरूवात झाली. सध्या फक्त सागरिका आणि झहीरच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या सोमवारी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी नोंदणी पद्धतीने झहीर- सागरिकाने लग्न केले.

सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रिण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले होते. मे महिन्यात झहीर- सागरिकाचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर दोघांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आणले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sagarika ghatge ties the knot with zaheer khan see first photos of the couple