मराठी नाट्यप्रेमींच्या मनावर आपली छाप पाडणा-या ‘सही रे सही’ नाटकाने १५ ऑगस्टला १२ वर्षे पूर्ण केली. ‘सही रे सही’ हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. आपल्या बहुरंगी भूमिकांनी रसिकप्रेक्षकांनी खळखळून हसवणा-या भरत जाधवने आपला आनंद फेसबुकवरून व्यक्त करत रसिकांचेही आभार मानले. त्याने पोस्ट केले की, १५ ऑगस्ट २००२ ते १५ ऑगस्ट २०१४. आज “सही रे सही” ला बारा वर्ष पूर्ण झाली.या बारा वर्षाच्या प्रवासात नाटकाने हजारो वेळा हाउसफुलची पाटी झळकवली.अनेक रेकॉर्ड मोडले,अनेक नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले.तुफान प्रसिद्धी…पैसा…कौतुक……ख़ूप काही मिळाल. पण या सर्वांच्याहि वर जाऊन सगळ्यात जास्त महत्वाच वाटत ते या नाटकाला मिळालेलं रसिकांच अफाट प्रेम.खूप कमी नाटकांच्या वाट्याला हे एवढ प्रेम येत.या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपर्यात पोहोचलं. या सगळ्याच श्रेय जातं ते माय बाप रसिक प्रेक्षकांना,’सही’ च्या संपूर्ण टीमला आणि ज्याने हि किमया रचली तो माझा जिवलग मित्र,केदार शिंदे याला. इतकी वर्ष होऊन सुद्धा आजही हे नाटक हाउसफुल च्या गर्दीत सुरु होत हि देवाची आमच्यावर असलेली कृपा आणि तुमच प्रेम आहे. तुमच ‘सही’ वरील प्रेम असच राहू द्या,तुफान मनोरंजनाची हमी मी देतो…!!!
काही दिवसांपूर्वीच ‘सही रे सही’ हे नाटक हिंदीतही सुरु झाले आहे. यात शर्मन जोशी मुख्य भूमिकेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा