अभिनेत्री साई पल्लवी ही दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साईचा आज ९ मे रोजी वाढदिवस आहे. आज साई तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. साईचे लाखो चाहते आहेत. साई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते.
साईने प्रेमम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून मिळाली. पण अभिनेत्री होण्याचं स्वप्न तिनं कधी पाहिलं नव्हतं. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं. २०१४ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिला प्रेमम चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की साई तिच्या चित्रपटांमध्ये मेकअपशिवाय दिसते. याच कारणामुळे साई ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चित्रपटांमध्ये कॅमेऱ्यासाठी आवश्यक तितकाच मेकअप ती करते.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
आणखी वाचा : मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद
साई पल्लवीला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी विचारणा करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी तिला तब्बल २ कोटी रुपयांचं मानधनही मिळणार होतं. मात्र साई पल्लवीने एवढ्या कोट्यावधी रुपयांचं मानधन धुडकावून लावत ही जाहिरात नाकारली होती. तिच्या म्हणण्यानुसार, सुंदर दिसण्यासाठी ती कधीही मेकअपचा वापर करत नाही आणि लोकांना गोंधळात टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तिला प्रचार करायचा नाही.