Sai Pallavi Dance Video : सध्या मराठी गाण्यांची इन्स्टाग्रामपासून ते फेसबुकपर्यंत सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. २०१० मध्ये ‘नटरंग’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामधल्या लावण्या, गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. “वाजले की बारा…” आणि “अप्सरा आली…” या दोन लावण्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचा ‘अप्सरा आली’वर थिरकतानाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिदा’, ‘प्रेमम’, ‘लव्हस्टोरी’, ‘काली’, ‘मारी २’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार आणि बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी सध्या बहीण पूजाच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री बहिणीच्या लग्नसोहळ्यात मराठी गाण्यावर थिरकली आहे.

हेही वाचा : “Bigg Boss पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं XXX…”, अभिजीत केळकरच्या खोचक पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला…

साई पल्लवीचा मराठी गाण्यावर डान्स

साई पल्लवी तिच्या सहज सुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यात “अप्सरा आली…” या ‘नटरंग’ चित्रपटातील लावणीवर जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी तिने मोरपिशी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. तिच्या दिलखेचक अदा आणि जबरदस्त डान्सची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेषत: साई पल्लवीने मराठी गाण्यावर डान्स केल्याने तिचे चाहते भरतेच खूश झाले आहे. तिचा ‘अप्सरा आली…’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या अनेक फॅनपेजसने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

साई पल्लवीचे बहिणीच्या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांबरोबर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, बहिणीच्या लग्नात तिने पांढऱ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. दाक्षिणात्य लूकमध्ये साई पल्लवी खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा : Video : “संध्याकाळी ५.३० वाजता Dinner, लवकर झोपते अन्…”, लेक वामिकामुळे बदलली अनुष्का शर्माची दिनचर्या; म्हणाली…

दरम्यान, साई पल्लवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर काम करणार आहे. हा बिग बजेट सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai pallavi dances on marathi song apsara aali at sister wedding video viral sva 00