दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने तिचा आगामी विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर नुकतंच साई पल्लवीने तिच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं साई पल्लवीने म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. नुकतंच साई पल्लवीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत याबद्दल भाष्य केले. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले, असे तिने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिंचिंगच्या घटना सारख्याच”; साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद

“मी अशा माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतेय हे पहिल्यांदा घडत आहे. मी कायमच माझ्या मनात जे असेल ते बोलत असते. मी स्पष्टीकरण देण्यास किंवा माझी बाजू मांडण्यास थोडा उशीर केला आहे, याची मला जाणीव आहे. पण मला माफ करा. कारण मी केलेलं विधान खूप चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्यात आले आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, धर्माच्या नावाने कोणताही वाद करणे चुकीचे आहे.

नुकतंच एका मुलाखतीत मला तू डावे आणि उजवे यातील कोणाला पाठिंबा देते, असे विचारण्यात आले होते. त्यावर मी म्हटलं होतं की मी तटस्थ आहे. या सर्वांच्या आधी आपल्याला एक चांगला माणूस व्हायला हवे आणि अशाप्रकारे छळ झालेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देण्याची आवश्यक आहे.

मला १४ वर्षांपूर्वी शाळेचे काही दिवस आठवतात. त्यावेळी आम्ही दररोज शाळेत जायचो आणि प्रतिज्ञा म्हणायचो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ते मला अजूनही आवडते. मला त्याचा अभिमान वाटतो. लहान असताना कधीही जात, धर्म आणि अस्मिता यावरुन विभागण्यात आले नाही. त्यामुळे मी जेव्हा काही बोलतो तेव्हा त्याचा अगदी तटस्थपणे विचार करतो. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी तटस्थ विचार करणारी व्यक्ती आहे. पण माझ्या वक्तव्यानंतर बाहेर जे काही घडलं ते पाहून मला स्वत:ला मोठा धक्का बसला. या सर्व प्रकारामुळे मला खूप दुःख झालं आहे. त्यापुढे इथून पुढे मी काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन”, असे साई पल्लवीने स्पष्टीकरण देताना म्हटले.

साई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून म्हटले की, ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे’. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने म्हटले आहे की, ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत’. साई पल्लवीच्या वक्तव्यावर अशा संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या. तसेच तिच्याबद्दल तक्रारही नोंदवण्यात आली होती.