दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून साई पल्लवीला ओळखले जाते. ती कायमच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. प्रेमम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीझोतात आली. अभिनयाव्यतिरिक्त साई पल्लवी ही उत्तम डान्सरही आहे. नुकतंच तिने तिच्या आयुष्यातील पहिल्या डान्स परफॉर्मन्सबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
अभिनेत्री साई पल्लवीने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखीत तिला तिच्या लहानपणीच्या काही आठवणी विचारण्यात आल्या. यावेळी तिने तिच्या डान्सबद्दलची आठवण सांगितली. “मी पहिल्यांदा मंचावर डान्स केला, त्यावेळी साधारण ५ ते ६ वर्षांची होते. मी पहिलीत शिकत होते. त्यावेळी माझे केस बॉयकट होते. मी त्यावेळी मंचावर शाहरुख खान, करिश्मा कपूरच्या दिल तो पागल है चित्रपटातील गाण्यावर नाचली होते. ते माझे पहिले नृत्य होते”, असे साई पल्लवीने यावेळी सांगितले.
आणखी वाचा : “इथून पुढे काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन”, काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या विधानावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण
“हा डान्स करताना त्यावेळी मोठा स्टेज असे काही नव्हते. एका साध्या व्यासपीठावर मी हा डान्स केला होता. त्यावेळी ती आंतरशालेय स्पर्धा होती. मला माहित नाही की माझी आई मला तिथे का घेऊन गेली, पण मी तिच्याबरोबर गेलो. त्यावेळी मी लांब केस दिसावेत यासाठी माझ्या केसांना क्लिपच्या मदतीने ओढणी जोडली होती.
पण मी डान्स करत असताना ती ओढणी पडली. यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटत होते. मला अजूनही आठवतंय की मी डान्स संपल्यानंतर मंचावरुन खाली उतरले आणि आईला पाहून जोरजोरात रडू लागले. त्यावेळी माझ्या आईला वाटले की मी फारच टॅलटेंड आहे. मला नृत्यात रस आहे. मी नृत्यातच करिअर करावं”, असेही ती म्हणाली.
आणखी वाचा : “काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिंचिंगच्या घटना सारख्याच”; साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद
दरम्यान साई पल्लवीचा मुरुमाने भरलेला चेहरा, तेलकट चेहरा, मेकअप नसलेली अभिनेत्री म्हणूनच ओळख झाली होती. तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात तिने प्रमुख भूमिका तर साकारल्या पण आता तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्येही स्थान मिळवलं आहे.