सर्वसामान्यांपासून ते फिल्म इंडस्ट्रीमधील अनेकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहायला आवडतात. पण कलाकारांना बऱ्याचदा सामान्य लोकांप्रमाणे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहाता येत नाहीत. त्यामुळे ते अनोखी शक्कल लढवताना दिसतात. असेच काहीसे दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लईने केले आहे.
सध्या साई पल्लईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती सर्वसामान्यांप्रमाणे चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहायला गेल्याचे दिसत आहे. ती चाहत्यांसोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेत आहे. एक अभिनेत्री असल्यामुळे तिला बुरखा परिधान करुन गुपचूप चित्रपटगृहामध्ये जावे लागले आहे. तिने स्वत:चाच ‘श्याम सिंघा रॉय’ हा चित्रपट पाहिला आहे. चित्रपटगृहामधून बाहेर पडल्यानंतर साईने तिचा चेहरा दाखवला आहे.
Video: आता कुणाला उडवणार आहेस?; पनवेलमध्ये रिक्षा चालवल्यामुळे सलमान खान झाला ट्रोल
सोशल मीडियावर साईचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती राहुल संक्रित्यनसोबत चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. चित्रपट पाहिल्यावर साई कॅमेरा समोर पोज देते. ‘श्याम सिंघा रॉय’ चित्रपटात साईने रोझी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित झाला आहे.