सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की जल्लोष, दिपोत्सव, आतिषबाजी, रांगोळी आणि ठिकठिकाणी केलेली सजावट डोळ्यासमोर येते. प्रत्येक ठिकाणी दिवाळी विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रत्येक सण हे वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येक ठिकाणच्या परंपरा या जशा वेगवेगळ्या असतात, तशी तिकडची भाषाही वेगळी असते. सध्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी काही दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे काही पर्यायी शब्द सांगितले आहेत.
सध्या इन्स्टाग्रामवर माहोल मुली हे रिल ट्रेंड होताना दिसत आहे. माहोल मुलींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलींनी यावेळी असे काही शब्द आणलेत की जे ऐकून सर्वांना हसू येईल. या माहोल मुली म्हणजे अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समिधा गुरु, मृणाल देशपांडे आणि सई रानडे. या चौघींनी हे इन्स्टाग्राम रिल्स शेअर केले आहे. यावेळी त्यांनी प्रमाण मराठी भाषेतील काही शब्द वऱ्हाडी भाषेत कशापद्धतीने बोलले जातात किंवा त्या शब्दांना पर्यायी वऱ्हाडी शब्द काय याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “राज काका तुमचे विचार…” सायली संजीवने व्यक्त केली मनातील भावना
या चौघींचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांनी दिवाळीत सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे पर्यायी शब्द सांगितले आहे. ते सांगून त्यांनी सर्वांच्या ज्ञानात आणखी भर पाडली आहे.
या व्हिडीओची सुरुवात “चला चला दिवाळी आली, माहोल मुलींच्या माहोल शब्दांची वेळ झाली”, असं म्हणत त्या चौघीजणी करतात. त्यानंतर भार्गवी म्हणते “चला दारू उडवूया”, त्यावर समिधा म्हणते, “दारू पितात”. मृणाल म्हणते, “फटाके उडवतात”. नंतर सई सांगते, “दारू म्हणजेच फटाके”. त्यानंतर त्या चौघीजण आणखी तीन शब्द सांगता. यात एक शब्द झाड. झाडाला वऱ्हाडी भाषेत “अनार” म्हणतात. तर भुईचक्रला “चक्री” आणि चिरोट्यांना “चिरवंट” म्हणतात. त्यांनी सांगितलेले हे तीन शब्द आपण दरवर्षी दिवाळीला आवर्जून वापरतो.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली
माहोलमुलींचा दिवाळी स्पेशल माहोल, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहे. तसेच काहीजण या व्हिडीओवर प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.