मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सई गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘पेट पुराण’ या आगामी सीरिजमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करण्यावरील उत्साहवर्धक सोशल कॉमेडी सीरिज आहे.
हलक्या-फुलक्या सुखद क्षणांनी भरलेली आणि महाराष्ट्रीयन पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज शहरी, उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्या दोघांकडे दोन पाळीव प्राणी असून त्यात बाकू नावाची मांजर व व्यंकू नावाचा कुत्रा आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
कुटुंबामध्ये पाळीव प्राणी आणणारे अतुलनीय प्रेम दाखवणाऱ्या या सीरिजमध्ये सई ताम्हणकर स्वावलंबी, प्रबळ इच्छाशक्ती असलेली, पण भावूक महिला अदितीची भूमिका साकारणार आहे. अदिती पाळीव प्राण्याची पालक बनते तेव्हा तिच्यामध्ये आनंद व भावनेसोबत मातृत्व निर्माण होते. रोमांचक बाब म्हणजे वास्तविक जीवनात सई यासगळ्याच्या विपरीत आहे. “मला एक अभिनेत्री म्हणून पाळीव प्राण्याच्या पालकाची भूमिका साकारण्याबाबत खात्री नव्हती, कारण पाळीव प्राण्यांशी भावनिकदृष्ट्या किती मिसळून जाईन हे माहीत नव्हते. पण आम्ही चित्रीकरणाला सुरूवात करताना पाळीव प्राणी मला माझ्या मुलांसारखेच वाटले आणि काम करताना ते काम आहे असं मला वाटलं नाही”, असं सई यावेळी म्हणाली.
आणखी वाचा : अरुंधती येतेय देशमुख कुटुंबाच्या जवळ पण अभि…, ‘आई कुठे करते’ मालिकेत नवा ट्वीस्ट
पुढे सई म्हणाली, “त्यांच्यामागून धावणे आणि नेहमी माझ्यासोबत ते आहे हा अनुभव उत्तम होता. खरतर, मी कधीकधी ते अवतीभोवती असण्याचे मिस करायचे. मला खात्री आहे की, ही सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या स्वत:च्या पाळीव प्राण्यांसोबतचे अनुभव आठवतील. ट्रेलर लाँच झाल्यापासून प्रेक्षक एकत्र येऊन पाळीव प्राण्यांचे पालक असण्याबाबत चर्चा करत आहेत आणि याबाबत काही अद्भुत कथा पाहायला मिळालेल्या आहेत. मी आशा करते की, आमची सीरिज अधिकाधिक लोकांना पाळीव प्राणी दत्तक घेण्यास प्रेरित करेल. ही सिरीज निश्चितच तुम्हाला अवतीभोवती असलेल्या केसाळ मित्रांच्या प्रेमात पाडेल. माझेच उदाहरण घ्या! मला आता प्राणी खूप आवडू लागले आहेत.”
आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक
आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’
‘पेट पुराण’चे दिग्दर्शन व लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केले असून ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या सीरिजचे निर्माते आहेत. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर अभिनीत ही सिरीज ६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड व बंगाली या भाषांमध्ये सोनीलिव्हवर सुरू होणार आहे.