चित्रपटातील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात दिसतात. कोणी दिग्दर्शन, छायांकन तर कोणी फोटोग्राफी किंवा चित्र काढून आपल्यात अभिनयाव्यतिरिक्त काही वेगळे कलागुण असल्याचे दाखवतात. असेच कलागुण प्रेक्षकांसमोर आणले आहेत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांनी.
संजय जाधव दिग्दर्शित आगामी ‘तू ही रे’ चित्रपटातील ‘तोळा तोळा’ हे गाणे सध्या गाजते आहे. तेजस्विनी पंडीत आणि स्वप्निल जोशीवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे बेला शेंडेने गायले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचे अनप्लगही तयार करण्यात आले आहे. ‘अनप्लग तोळा तोळा’ गाणे गायले आहे खुद्द चित्रपटातील अभिनेत्री सई आणि तेजस्विनीने. तेजस्विनीला आपण ‘नांदी’ या संगीत नाटकातून गाताना ऐकले असेल पण सईने गाण्याचा हा पहिलावहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल सई म्हणाली, मला गाणी ऐकायला गुणगुणायला आवडतात पण असा प्रयत्न आपण कधी करू असं वाटलं नव्हतं. मला प्रयोगशील राहायला आवडतं. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला. यासाठी मला संगीत दिग्दर्शक अमितराज याची खूप मदत झाली. त्याने माझ्याकडून गाऊन घेतलं असंच मी म्हणेन.
स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तू ही रे’ येत्या ४ सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे.
लोकसत्ताशी संवाद साधताना ‘अनप्लग तोळा तोळा’ गाण्याच्या काही ओळी सई आणि तेजस्विनीने गुणगुणल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा