३० डिसेंबर रोजी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि नावाप्रमाणेच या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट दमदार कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची कथा, चित्रपटातील गाणी हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं आहे. अनेकांनी या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. पण या गाण्यावर नाचता न आल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोल झाली आहे.
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. ती नेहमीच ट्रेंडला फॉलो करत आपले फोटो नाहीतर व्हिडीओ पोस्ट करत असते. आता तिचा ‘वेड लागलंय’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. परंतु या गाण्यावर नाच करणं तिला अजिबात जमलेलं नाही. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
आणखी वाचा : चौथ्या आठवड्याच्या शेवटीही ‘वेड’चा जलवा कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
‘वेड’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता शुभंकर तावडे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तो सई ताम्हणकरला ‘वेड लागलंय’ या गाण्याच्या स्टेप्स शिकवताना दिसत आहे. आधी शुभंकर एक स्टेप करतो आणि नंतर सई ती फॉलो करते. पण या स्टेप्स फॉलो करत असताना सई अनेकदा चुकते. त्यामुळे या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : “…तेव्हा व्यक्त होताना १० हजार वेळा विचार करावा लागतो,” सई ताम्हणकरने मांडलं स्पष्ट मत
या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “सई ताम्हणकर एवढी मोठी अभिनेत्री असूनदेखील तिला जमलं नाही. माझी छोटीशी मुलगी छान करते.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “स्टेप्स बघायला वेळ नाही मिळाला म्हणून तू शिकवतोय… पण काय फायदा, तिने ते चुकीचं केलंय.” आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत “तुला डान्स आणि एक्टिंग येत नाही,” असंही तिला म्हटलं. आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.