अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने बिकिनी परिधान केल्यामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीने कशी वागणूक दिली आणि त्यानंतर तिला कसे चित्रपट मिळू लागले यावर वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सईने नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सईने बिकिनी आणि त्यानंतर तिला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफरवर वक्तव्य केलं आहे. सईने ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’ चित्रपटात बिकिनी परिधान करत मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. “जेव्हा मी बिकिनी परिधान केली, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीने मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं. पण असं जरी असलं तरी थोड्याप्रमाणात माझ्यावर टीकाही झाली.

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

आणखी वाचा : “हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्यावेळी प्रेग्नेंसी विषयी कळले आणि…”, नम्रता संभेरावने केला खुलासा

पुढे चित्रपटांविषयी बोलताना सई म्हणाली, “मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. ‘हंटर’नंतर मला त्या पद्धतीच्याच भूमिका येत होत्या. पण तीन वर्षानंतर लव्ह सोनिया चित्रपट मिळाला. यातील भूमिका वेगळी होती म्हणून मी तो चित्रपट केला.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar on wearing bikini for the first time in marathi film how industry reacted dcp