अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. चित्रपट, वेबसीरिज असो वा एखादी भूमिका सई याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. शिवाय आपले बरेच फोटो ती शेअर करताना दिसते. व्यग्र वेळापत्रकामधून स्वतःसाठी वेळ काढत सईने पावसाचा आनंद लुटला आहे. यादरम्यानचेच काही फोटो सईने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या अभिनेत्याचं एक पाऊल पुढे, हिंदी वेबसीरिजमध्ये मिळाली भूमिका
सध्या सगळीकडे पावसाचं सुंदर वातावरण निर्माण झालं आहे. घनदाट झाडी, हिरवागार निसर्ग, डोंगराळ भागातून वाहणारे धबधबे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कलाकार मंडळी देखील या सुंदर निसर्गाच्या प्रेमात आहेत. काही कलाकार मंडळींनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पावसाचा आनंद लुटतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये सईचाही नंबर आहे.
पाहा फोटो
सईने आपले फोटो शेअर करत म्हटलं की, “मूड”. या फोटोंमध्ये सईने निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबरीने दाट धुकं, घनदाट जंगल लक्ष वेधून घेणारं आहे. पावसाचा आनंद लुटताना सईच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत आहे. पण सई नक्की कुठे गेली होती? हे तिने सांगितलेलं नाही.
आणखी वाचा – “कंगना रणौतबरोबर काम करणंच माझी मोठी चूक”; सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
सईच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सईचा काही दिवसांपूर्वीच ‘मिडियम स्पायसी’ चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच तिच्या हातात सध्या काही हिंदी चित्रपटही आहेत. मराठीसह सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे.