मनोरंजनसृष्टीत कोणाच्या वाटय़ाला केव्हा आणि काय येईल, हे सांगणे कठीण आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनयाबरोबरच आपल्या हॉट दृष्यांसाठीही प्रसिद्ध असलेल्या सई ताम्हणकरने नाकारलेली एक छोटेखानी भूमिका रूपाली भोसले हिच्या वाटय़ाला आली आहे. या भूमिकेसाठी सईनंतर रेशम टिपणीसचाही विचार झाल्याचे समजते. ही भूमिका कोणत्याही चित्रपटासाठी नसून एका मालिकेच्या एका विशेष भागापुरती मर्यादित आहे. पण अशा दुसऱ्याने नाकारलेल्या भूमिका स्वीकारून स्टार झालेल्या मंडळींच्या कथा ऐकल्या की, रूपालीचे नशिबही फळफळायला हरकत नाही, असे वाटते.
आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेचा विशेष भाग १ मे, महाराष्ट्र दिनी प्रसारित होणार आहे. या भागापुरत्या काही व्यक्तिरेखा मराठी शिकण्यासाठी मालिकेत प्रवेश करतात, असे दाखवण्यात आले आहे. त्यात हवाई सुंदरीच्या एका भूमिकेसाठी ‘सुंदरी’ची निवड करण्याचा प्रश्न आला. त्या वेळी साहजिकच सई ताम्हणकरचे नाव पुढे आले. मात्र सईने वेळ नसल्याने ही भूमिका करण्यास नकार दिल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सईनंतर निर्मात्यांनी रेशम टिपणीससाठी चाचपणी करण्यास सुरुवात केली. पण रेशम सध्या श्रीनगरमध्ये असल्याने तीदेखील उपलब्ध नसल्याचे कळले. अखेर या विशेष भागातील हवाई सुंदरीची भूमिका रूपाली भोसलेच्या वाटय़ाला आली. रूपाली आणि वैभव हे दोघेही ‘करून गेलो गाव’ या नाटकात एकत्र काम करत आहेत. त्यामुळे रूपालीच्या अभिनय गुणांबाबत खात्री पटवून घेतल्यानंतरच तिची निवड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सई ताम्हणकर आणि रेशम टिपणीस या दोन मदनिकांना डोळ्यासमोर ठेवून रचलेल्या भूमिकेसाठी तेवढय़ाच सुंदर रूपालीची निवड झाल्यानंतर आता तिच्या करिअरच्या गाडीने वेग घ्यायला हरकत नाही.
सईने नाकारली, रूपालीला मिळाली!
मनोरंजनसृष्टीत कोणाच्या वाटय़ाला केव्हा आणि काय येईल, हे सांगणे कठीण आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनयाबरोबरच आपल्या हॉट दृष्यांसाठीही प्रसिद्ध असलेल्या सई ताम्हणकरने नाकारलेली एक छोटेखानी भूमिका रूपाली भोसले हिच्या वाटय़ाला आली आहे.
आणखी वाचा
First published on: 27-04-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar rejected rupali got