एखाद्या ठिकाणी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा शब्द थोडा मोठ्याने उच्चारला तर सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळतील. पण आता याच नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा रंगकर्मी आणि अभिनेता अशी ओळख असणारा आलोक राजवाडे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतच सईने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटात सई आणि अमेय व्यतिरिक्त सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar upcoming movie ashleel udyog mitra mandal avb