अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तैमुरच्या फोटोपासून त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सोशल मीडियावर तैमुरचे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात. गोंडस तैमुरचा आणखी एक फोटो आता सर्वांसमोर आलाय. वांद्रे येथील आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तैमुर झोपाळ्याचा आनंद लुटताना या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तैमुरवरून कोणाचीच नजर हटणार नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

फोटोमध्ये झोपाळ्यावर लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बसलेला तैमुर खूपच गोड दिसतोय. ज्याप्रमाणे करिना कपूर आपल्या चेहऱ्यावरील आकर्षक हावभावांसाठी प्रसिद्ध आहे तसेच हावभाव तैमुरच्या गोंडस चेहऱ्यावर नेहमीच टिपले गेले आहेत. याआधी तैमुरचा निरागस चेहरा अनेकदा माध्यमांच्या कॅमेरांमध्ये टिपला गेला. प्रत्येक फोटोमधील तैमुरच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वांनाच आकर्षित करणारे होते. आतादेखील झोपाळ्यावर बसलेल्या तैमुरचे निरागस हावभाव अचूकपणे कॅमेरात टिपले गेले आहेत.

taimur-1

taimur-2 taimur-3

वाचा : छोटा पडदा कधीच सोडणार नाही- मौनी रॉय

याआधी एका मुलाखतीत करिनाने म्हटले होते की, ‘तैमुर कपूर कुटुंबाप्रमाणे दिसतो. त्याचे निळे डोळे माझ्या आजोबांप्रमाणे आणि लोलो (करिष्मा) प्रमाणे आहेत.’ अनेकांना हा छोटा नवाब आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजेच सैफ अली खानप्रमाणे वाटतो. तर, काहीजणांना तैमुर हुबेहुब करिनाप्रमाणेच दिसतो असं वाटतं. दरम्यान, तैमुर सध्या बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पाच महिन्यांचा तैमुर आई करिना कपूरसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागलाय.

Story img Loader