बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि राणी जवळपास १२ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत.
‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला राणी मुखर्जी आणि सैफ गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी दोघेही जवळपास १२ वर्षांनंतर एकत्र काम करत असल्याचे सांगत आहेत. त्याचवेळी मागून सिद्वांक चतुर्वेदी आणि शारवरी यांची एण्ट्री होते. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. तसेच सैफ आणि राणीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Video: काजोल आणि बहिण तनिषामध्ये भर मंडपात जुंपली, आईने केली मध्यस्थी
‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. तसेच अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन देखील चित्रपटात झळकले होते. आता जवळपास १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात अभिषेक ऐवजी सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळते.
येत्या १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी राणी आणि सैफने ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ चित्रपटात एक दिसले होते. आता जवळपास १२ वर्षांनंतर ते पुन्हा ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.