सैफ अली खान आणि करिना कपूर- खानचा मुलगा तैमुर अली खान पतौडी सध्या लंडनमध्ये आई- बाबांसोबत सुट्यांचा आनंद लुटत आहे. त्याच्या या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कमालिचे व्हायरल होत आहेत. लंडनमध्येही तैमुरच्या चाहत्यांची काही कमतरता नाही. तैमुरला आई- बाबांसोबत रस्त्यावरून फिरताना तेथील अनेक लोकांनी पाहिले.
त्यातील काहींनी त्यांचा फोटो घेण्याचाही प्रयत्न केला. पण सैफला ही गोष्ट फारशी पटली नाही आणि त्याने फोटो काढणाऱ्या व्यक्तीला रोखलं.या फोटोमध्ये सैफच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव स्पष्टपणे दिसत आहेत. लंडनच्या रस्त्यावर मुक्तपणे फिरणारे सैफ- करिनाचे अनेक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
लंडनमध्ये सैफ आणि करिनाने एका जाहिरातीचे चित्रीकरणही केले. या जाहिरातीचे दोन फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. मिस इंडिया पेजेंट कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी करिना दोन दिवसांसाठी भारतात येणार आहे. नंतर पुन्हा ती लंडनला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी जाणार आहे. जूनच्या अखेरीस सैफ- करिना मुंबईमध्ये परततील असे म्हटले जात आहे.