बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने उत्तम अभिनय शैलीमुळे कलाविश्वामध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गंभीर, विनोदी अशा एक ना अनेक भूमिका त्याने साकारल्या असून त्याच्या याच भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप उमटवली आहे. सैफ नेहमी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. परंतु नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंहने घटस्फोटावेळी मागितलेल्या रक्कमेबाबत खुलासा केला आहे. २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. दरम्यान अमृताने मागितलेली रक्कम त्यावेळी एका दमात देणे सैफला शक्य नव्हते. त्यामुळे पोटगीची रक्कम हप्त्याने अमृताला दिल्याचा खुलासा सैफने केला.
अमृताने पोटगी म्हणून ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचेही सैफने सांगितेल. ‘त्यावेळी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु होता. अमृताने मागितलेली एवढी मोठी रक्कम एका दमात देणे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे मी ही रक्कम हप्त्याने अमृताला दिली. दरम्यान इब्राहिम मोठा होईपर्यंत दर महिन्याला मी १ लाख देईन असे वचनही अमृताला दिले होते’ असेही सैफ म्हणाला.
अमृता आणि सैफची ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरचांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करिना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.