‘बुलेट राजा’ या तिग्मांशू धुलियाच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी सैफ अली खान टॅनिंग करून त्वचेचा रंग सावळा करणार आहे. ‘बुलेट राजा’ चित्रपटात सैफ एका ग्रामीण गॅंगस्टरची भूमिका करत असून, यासाठी त्याने नैसर्गिक रित्या त्वचेचा रंग सावळा करण्याचे ठरविले आहे.
या भूमिकेसाठी सैफच्या त्ववचेचा रंग सावळा हवा अशी तिग्मांशूची इच्छा होती. याची महिती मिळताच सैफने मेकअपच्या ऐवजी सूर्यप्रकाशात बसून नैसर्गिक रित्या त्वचेचाचा रंग सावळा करण्याचे ठरवले. हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader