बॉलीवूड चित्रपटातून करोडोंची कमाई करणारा सैफ अली खान मात्र स्वतः हिंदी चित्रपट पाहत नाही. याचा खुलासा चक्क करिना कपूरने केला आहे.
‘एलओसी कारगिल’, ‘ओमकारा’, ‘कुर्बान’ आणि ‘एजन्ट विनोद’ या चित्रपटात सैफसोबत काम करणारी ३३ वर्षीय करिना म्हणाली की, आम्ही वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकमेकांपासून वेगळे ठेवतो. सैफ क्वचितच हिंदी चित्रपट पाहतो. तो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो, पण ते पाहत नाही. मी कोणत्या चित्रपटात काम करत आहे हे त्याला अजीबात माहित नसते. मी कोणता चित्रपट करत आहे किंवा कोणाबरोबर करत आहे, असं त्याने मला केव्हाही विचारलेल नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे वैयक्तिक जीवनास व्यावसायिक गोष्टींपासून पूर्णपणे दूर ठेवतो. केवळ एकाच क्षेत्रात असल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र आहोत, असे नाही.
करीनाचा ‘गोरी तेरे प्यार मै’ हा चित्रपट आजचं प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड पार्टींमध्ये पती-पत्नीने एकत्र जाने आवडत नसल्याचेही ती म्हणाली. सैफपेक्षा १० वर्षांनी लहान असलेली करिना त्याच्याकडून रोज काही नवीन शिकते, असे तिने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा