बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांचे काही फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याने ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतंच करीनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

करीना कपूर ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ती पुन्हा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे आणि सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप योगदान दिले आहे”, असे करीनाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. करीनाच्या या स्पष्टीकरणानंतर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचे समोर आलं आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…

तिसऱ्यांदा गरोदर आहे करीना कपूर खान? बेबी बंपचा फोटो होतोय व्हायरल

करीना कपूरसोबत ही सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनला तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रीण अमृता अरोरादेखील पाहायला मिळत आहेत. या दोघींनीही सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यात सर्वजण व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. एकूणच करीना कपूर तिच्या कुटुंबासोबत खूप चांगला वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. तसेच करीना कपूरने पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

केवळ २ तासात करीना कपूरने बदलले होते १०० हून अधिक ड्रेस, ‘या’ चित्रपटासाठी केला होता खटाटोप

पण अशात करीनाचा एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे तिचे चाहते देखील गोंधळले आहे. या फोटोमध्ये ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या फोटोवरून करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी हा प्रश्न केला होता. मात्र त्यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. पण आता नुकतंच तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Story img Loader