बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा ‘दिल चाहता है’ या २००२ सालच्या गाजलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबर काम करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन ‘तलाश’ चित्रपटाची दिग्दर्शिका रीमा कागती करणार आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची अद्याप निवड झालेली नसली, तरी मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील प्रमुख अभिनेत्री या भूमिकेसाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. सैफ अली खानबरोबर शोभून दिसेल आणि जिचा स्वत:चा असा मोठ्या पडद्यावरील खास प्रभाव असेल अशा दमदार अभिनेत्रीच्या शोधात चित्रपटकर्ते असल्याचे सुत्रांकडून समजते. सध्या सैफ ‘हमशकल्स’ या आपल्या आगामी विनोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. त्याशिवाय तो कबिर खान दिग्दर्शित ‘फॅण्टम’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या चित्रीकरणात कतरिना कैफबरोबर व्यस्त असून, इलियाना डिक्रुझबरोबर तो ‘हॅपी एन्डिंग’ नावाचा चित्रपट करत आहे. या चित्रपटाची निर्मीती सैफ अली खानच्या निर्मितीसंस्थेद्वारे करण्यात येत आहे.

Story img Loader