साजिद खानच्या ‘हमशकल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर चांगला गल्ला कमावलाच होता. पण, त्याच्या या चित्रपटाचीही तितकीच खिल्ली ट्विटकरांनी उडवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आपण हा चित्रपट करून चूकी केल्याचे सैफ अली खान म्हणाला होता. त्याला दुजोरा देत सैफने ‘हमशकल्स’ करून चुकी केल्याचे करिनाने म्हटले. ‘हमशकल्स’सारखा वात्रट विनोदी चित्रपट करून सैफ आनंदी नसल्याचे तिने म्हटले.
सैफ हा एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचे करिनाला वाटते. ती म्हणाली, मी अजूपर्यंत ‘हमशकल्स’ पाहिलेला नाही. हा चित्रपट करून अर्थातच त्याने चुकी केली आहे आणि याची त्याला जाणीवही आहे. ‘ओमकारा’, ‘परिणीता’ आणि इतर चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या अभिनयानंतर प्रेक्षकांना तो या रुपात अजिबात आवडलेला नाही. सैफ हा असा अभिनेता आहे जो चित्रपटसृष्टीला अजून पुढे नेऊ शकतो. करिनाने ‘गोलमाल’ हा विनोदी चित्रपट केला आहे. पण, हा वात्रट नव्हता आणि चित्रपटाची कथाही मजबूत होती असे ती म्हणाली.

Story img Loader