बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा पतौडी नवाब आहे. एवढंच काय तर नवाब असल्यामुळे सैफची संपत्तीही मोठी आहे. सैफ तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त सैफ चित्रपट आणि जाहिरातीतून देखील प्रचंड पैसे कमवतो. सैफच्या या सगळ्या संपत्तीमध्ये हरियाणात असलेला त्याचा पतौडी पॅलेसपासून भोपालमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या संपत्तीचा समावेश आहे. मात्र, त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी मोठी संपत्ती असूनही सैफ आपल्या मुलांना ती देऊ शकत नाही.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सैफची सर्व वडिलोपार्जित मालमत्ता भारत सरकारच्या एनिमी डिस्प्यूट कायद्यांतर्गत येते. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही. कोणीही याला विरोध करून ही मालमत्ता आपली मालमत्ता मानत असेल, तर त्यांना उच्च न्यायालयात जावे लागेल.
आणखी वाचा : रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा सीन कापण्याची दिली धमकी
उच्च न्यायालयातही या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही या प्रकरणाचा निर्णय लागला नाही तर त्यावर निर्णय देण्याचा अधिकार फक्त देशाच्या राष्ट्रपतींना आहे. दरम्यान, सैफचे पणजोबा हमीदुल्ला खान ब्रिटिश काळात नवाब होते. परंतु त्यांनी आपल्या मालमत्तेचे कोणतेही मृत्युपत्र केले नव्हते. त्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सैफच्या आजीच्या कुटुंबासोबत या प्रकरणामध्ये काही मतभेद सुरु आहेत. त्यांचा देखील या मालमत्तेशी संबंध आहे. त्यामुळे सैफ त्याच्या मुलांना संपत्ती देऊ शकत नाही.