अभिनेता सैफ अली खानने अनिवासी भारतीय उद्योगपती व त्यांच्या सास-यांना मारहाण केल्याप्रकरणाची सीडी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात सादर केली. त्याचसोबत, पोलिसांनी सदर घटनेच्यावेळी सैफने घातलेले कपडेही न्यायलयात सादर केले. ही घटना गेल्यावर्षी २२ फेब्रुवारीला वास्बी रेस्टॉरन्ट येथे घडली होती.
इक्बाल शर्मा यांनी सैफला हळू बोलण्यास सांगितले. त्यामुळे सैफने शर्मा व त्यांच्या सास-यांना मारहाण केली होती. याबाबतची तक्रार शर्मा यांनी पोलिसांमध्ये केली होती. त्यानंतर सैफ आणि त्याचे मित्र शकील लदाक व बिलाल अमरोही यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. सैफ हा करिना कपूर, करिश्मा कपूर, मल्लिका अरोरा, अमृता अरोरा, शकील व बिलाल यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता त्यावेळी ही घटना घडली.

Story img Loader