बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र, या आधी सैफचे लग्न हे अभिनेत्री अमृता सिंगशी झाले होते. त्याकाळी त्यांच्या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या वयात असलेला फरक ते त्यांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय असायचा. मात्र, लग्न करण्याआधी सैफवर अमृताकडे पैसे मागण्याची वेळ आली होती. याचा खुलासा अमृताने एका मुलाखतीत केला होता.

१९९९ मध्ये सैमी गॅरवालच्या शोमध्ये अमृता आणि सैफने त्यांच्या प्रेमाची संपूर्ण कहाणी सांगितली होती. या दोघांची पहिली भेट ही राहुल रवैलच्या चित्रपटा दरम्यान झाली होती. राहुल आणि अमृता खूप चांगले मित्र होते. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फोटोशूटला राहुलने अमृताला बोलावले. त्यावेळी सेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत सैफ एका होस्ट सारखं वागतं होता. फोटोशूटच्या दरम्यान, सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला आणि अमृताने तेव्हाच सैफचे निरीक्षण केले. अमृताला वाटले होते की असा हात ठेवून सैफने हिंमतच काम केलं आहे.

Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Self Awareness and Self Acceptance are very important steps to succeed in any interview
पहिले पाऊल: मुलाखतीला सामोरे जाताना
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

त्यानंतर एकदिवस सैफने अमृताला कॉल केला आणि तिला डिनरसाठी विचारले, तेव्हा अमृता म्हणाली की, “मी डिनरला बाहेर जात नाही. पण, तुला पाहिजे तर तु माझ्याघरी डिनरसाठी येऊ शकतोस,” हे ऐकताच सैफ अमृताच्या घरी गेला. “मी तिथे कोणत्याही प्रकारच्या आशेने गेलो नाही. मला तिच्या सोबत थोडा वेळ व्यथित करायचा होता. तर तिला थोडं जाणून घेण्याची माझी इच्छा होती.”

आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट

याच दरम्यान त्यांनी पहिल्यांदा kiss केलं. लिपलॉकनंतर सैफने त्याच्या मनातली गोष्ट अमृताला सांगितली आणि म्हणाला की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे ऐकूण अमृता म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते.” सैफ पुढचे दोन दिवस अमृताच्या घरून निघाला नाही. जेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे सारखे फोन येऊ लागले, तेव्हा सैफने सेटवर जाण्याता निर्णय घेतला. यावर बोलताना अमृता म्हणाली, “सैफने त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने माझ्याकडे १०० रूपये मागितले होते.” मग अमृताने त्याला १०० रुपये घेण्यापेक्षा माझी गाडी घेऊन का जात नाही असे विचारले.

आणखी वाचा : “मी त्या अपराधीपणाने जगत आहे…”, ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत

यावर सैफ म्हणाला, “प्रोडक्शनची गाडी? मला त्याची गरज नाही.” तर यावर अमृता म्हणाली की, “हे माझ्यासाठी बरोबर नाही कारण माझी गाडी परत द्यायला तो नक्कीच परत येईल,” खरं तर तिला पुन्हा एकदा सैफला भेटायचे होते. तिला पुन्हा एकदा सैफला तिच्या घरी पाहायचे होते.

आणखी वाचा : कधी मारहाण, तर कधी शिवीगाळ ; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

सैफ आणि अमृता सिंह हे १९९१ साली लग्न बंधनात अडकले होते. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनी मतभेदांमुळे २००४ साली दोघांनी घटस्फोट घेतला.

Story img Loader