साजीद खानच्या आगामी ‘ हमशकल’ चित्रपटात सैफ अली खान आणि रितेश देशमुख हे तिहेरी भूमिका दिसणार आहेत. गो गोवा गोनमध्ये झोम्बी किलरच्या भूमिकेनंतर सैफ आता हा विनोदी चित्रपट करणार आहे. सदर चित्रपटात टेलिव्हिजन कलाकार राम कपूर हा देखील या दोन अभिनेत्यांसह तिहेरी भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण विदेशात होणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि पूजा एन्टरटेनमेंटच्या या चित्रपटाचे वाशू भगनानी हे निर्माता आहेत. ‘हमशकल’ पुढील वर्षी ६ जूनला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader