अभिनेता सैफ अली खान आणि रितेश देशमुख हे पहिल्यांदाच साजिद खानच्या विनोदी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत.
आम्ही सैफ अली खान, रितेश देशमुख आणि जॅकलीन फर्नांडिस यांची विनोदी चित्रपटासाठी निवड केली आहे. आमच्याकडे तगडी स्टारकास्ट असून या प्रोजेक्टला घेऊन आम्ही खूप आशादायी आहोत असं निर्माता वाशू भगनानी म्हणाले.
चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी याचे दिग्दर्शन साजिद खान करणार आहे. हिम्मतवाला नंतर वाशू भगनानीसोबत साजिद खान यांचा हा दुसरा चित्रपट असेल.
हा अतिशय वेगळ्या प्रकारचा विनोदी चित्रपट असून याची संकल्पना पूर्णपणे ताजी आहे, असं वाशू भगनानी म्हणाले. अभिनेता सैफ अली खान आणि रितेश देशमुख हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  
जॅकलीनने याआधी रितेश देशमुख सोबत अल्लादीन, जाने कहा से आयी है आणि हाऊसफुल-२ या चित्रपटांमध्ये काम केले असले तरी सैफ अली खानसोबत तीचा हा पहिलाच चित्रबपट आहे.
आम्ही यावर्षी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार असून पुढील वर्षी तो प्रदर्शित होईल, असं भगनानी म्हणाले. 

Story img Loader