बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक रणवीर सिंग आहे. रणवीर सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटाच्या चित्रकरणात व्यस्त आहे. त्यामुळे निर्माता करण जोहरने त्याचा ‘तख्त’ या चित्रपटाचा प्रोजेक्ट पुढे ढकलला आहे. ‘तख्त’ या चित्रपटात रणवीर सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट आहे. रणवीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदा ‘गल्ली बॉय’ चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या दोघांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा आलिया आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानकडे लागले आहे. इब्राहिम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘पिंकव्हिला’च्या अहवालानुसार, इब्राहिम या चित्रपटात केवळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. त्याला फक्त चित्रपट निर्मितीची प्रक्रिया शिकायची आहे. त्याला लाँच करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. तो आता त्याचे शिक्षपूर्ण करत आहे. इब्राहिमला अभिनेता व्हायचं आहे, पण त्याआधी त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तो इतक्यात डेब्यू करणार नाही. करण जोहरचे ‘धर्मा प्रोडक्शन’ हा रॉम-कॉम चित्रपट तयार करणार आहे. करण स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. इब्राहिम अली खान या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे.

आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, रणवीर सिंग ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३च्या वर्ल्डकप वर आधारीत आहे. यात दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader