सैफ अली खानची बहीण सबा अली खान बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सबा अनेकदा कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असते. सबा कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबतच फोटो शेअर करत अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसते. मात्र नुकतच एका नेटकऱ्याने सबाला विचित्र प्रश्न विचारत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

सबा अनेकदा आई शर्मिला किंवा तैमूर आणि इनाया सोबतच तसचं सैफ आणि करिनासोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोंवरूनच नेटकऱ्याने सबाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र सबाने देखील या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. सबाने करिना आणि एका परदेशी पाहूणीसोबतचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात कॅपशनमध्ये ती म्हणाली, “दिवाज्”. तर या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ” करीना कधी तुमच्या कमेंटला उत्तरही देत नाही आणि तुम्ही तिचे फोटो शेअर करत असता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba (@sabapataudi)

हे देखील वाचा: करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…

युजरच्या या कमेंटवर सबा उत्तर देत म्हणाली, “कारण माझं माझ्या वहिनीवर प्रेम आहे. स्वत:शी प्रामाणिक रहावं.” सबाच्या या उत्तररानंतर मात्र नेटकऱ्याने तिचं कौतुक केलंय. “तुझं मन खूप प्रेमळ आहे.” असं युजर म्हणाला. तसचं अनेक नेटकऱ्यांनी सबाच्या या उत्तरानंतर तिचं कौतुक केलं आहे.

सबाने कायमच बॉलिवूडपाून दूर राहणं पसंत केलं. सबा एख ज्वेलरी डिझायनर आहे. त्याचसोबत तिला टेरो कार्ड रिडिंगची आवड आहे. तर सैफची दुसरी बहिण सोहा अली खानने मात्र बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमावलं असलं तरी तिला फारसं यश मिळालं नाही. सध्या सोहाने देखईल अभिनयातून ब्रेक घेतला असून ती पती कुणाल खेमू आणि मुलीसोबत वेळ घालवताना दिसते.