बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीना एक कडक-शिस्तप्रिय आई नाही आहे. पण, तिला कधी कधी-कधी असे वाटते की पती सैफ हा त्यांच्या मुलाला तैमूरला बिघडवत आहे. यावर करीनाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला असून सैफवर आरोप केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘कॉस्मोपॉलिटन’ला करीनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत एका मुलाखतीत करीना तिच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. करीना म्हणाली की, “तिचा पती सैफ तैमूरचे जास्तच लाड करतो. त्यामुळे त्याला कधी-कधी एका वाईट पोलिसासारखे वागावे लागते.”
करीना म्हणाली, “मला अजुन थोडी शिस्त वाढवावी लागेल कारण सैफ तैमूरला इतक्या वाईट सवयी लावत. कधी कधी मला त्याचा प्रचंड राग येतो. उदाहरण द्यायचं झालं तर सैफला रात्री १० नाजता तैमूरसोबत चित्रपट पाहायचा आहे आणि मला आत जाऊन नाही म्हणावं लागतं कारण मला तैमूरला झोपवायचं असतं ती त्याची झोपायची वेळ असते.”
आणखी वाचा : Big Boss Marathi 3 नंतर अभिनेता विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?
करीना पुढे म्हणाली की, “आता जहांगीरसोबत आता गोष्टी हाताळणे खूप कठीण झाले आहे. पण ती घरात शिस्त पाळते. तिने सांगितले की, दोन्ही मुलांच्या दिवसभरातील काही गोष्टींची ती खूप काळजी घेते, विशेषतः त्यांच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेच्या बाबतीत. तिची इच्छा आहे की तिच्या मुलांनी काही ‘शिस्तबद्ध राहत’ मोठे व्हावे.”
आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!
करीना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.