नुकतेच बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि राज कपूर यांची नात करिना कपूर यांचे लग्न झाले. चित्रपट सृष्टीतील ही दोन मोठी घराणी एकत्र आल्यानंतर नवाब आता कपूर कुटुंबातही विशेष लक्ष घालायला लागले आहेत. जेष्ठ अभिनेते राज कपूर यांचा नातू अरमान जैन यांच्या बॉलीवूडमधील पदार्पणासाठी सैफ अली खान पुढे सरसावला आहे.
अरमान जैन हा अभिनेते रणधीर कपूर यांची बहिण रिमा जैन यांचा मुलगा आहे.
सैफ अली खानच्या इल्यूमिनाती फिल्म्स निर्मित चित्रपटाद्वारे अरमान पदार्पण करणार आहे.
इमतियाज अली याचा भाऊ आरिफ हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ही एक प्रेमकथा असेल.
चित्रपटात अरमानची नायिका कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan to launch raj kapoors grandson