बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आज १६ जुलै रोजी वाढदिवस आहे. आज सैफ त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफचा जन्म दिल्लीत झाला आहे. सैफ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. विशेषकरून सैफ पत्नी करीना कपूर खानमुळे चर्चेत असतो. सैफने करीनासोबत लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला पत्र लिहिले होते. याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफ आणि करीनाची पहिली भेट ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ या चित्रपटा दरम्यान झाली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. मात्र, करीना आणि सैफची जोडी बनली. सैफ आणि करीना बरेच वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी कोर्टमध्ये जाऊन शासकिय पद्धतीने लग्न केले. त्यानंतर त्यांनी लग्नाविषयी सगळ्यांना सांगितले.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफने मुलगी सारा अली खानसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी सैफने सांगितले की ‘त्याने लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.’

आणखी वाचा : आगळा वेगळा विवाहसोहळा! असे झाले अनिल कपूर यांच्या मुलीचे लग्न

सैफ हा अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांचा मुलगा आहे. सैफची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अमृता सिंग यांच्या वयात १२ वर्षांचा फरक आहे. सैफ अमृता पेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. हे दोघे पहिल्यांदा ‘दिल्लगी’च्या सेटवर झाली. त्या दोघांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहम अली खान अशी त्यांची नाव आहेत. तर सैफ आणि करीनाला २ मुलं आहेत. तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नावं आहेत.