अभिनेता सैफ अली खान  सध्या लॉस एंजेल्समध्ये आपल्या आगामी ‘हॅप्पी एन्डीग’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे खरा, पण चित्रपटाचे चित्रिकरण एका वादामुळे अडचणीत सापडले आहे.
सदर चित्रपटाचा सह-निर्माता दिनेश विजन याने चित्रपटात लॉस एंजेल्समधील चित्रपट कर्मचाऱयांना काम करण्यासाठी घेतले, परंतु लॉस एंजेल्स येथील नियमांनुसार तेथील ‘स्क्रिन कलाकर संघा’च्या सदस्यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी आहे आणि हॅप्पी एन्डीग चित्रपटाचे चित्रिकरण नियमांचे उल्लंघन करुन करण्यात आले आहे. त्यामुळे हॅप्पी एन्डीगचे चित्रिकरण वादाच्या भोवऱयावत सापडले आहे.
चित्रिकरणाचा खर्च कमी करण्यासाठी परवानगी नसलेल्या कलाकारांना चित्रपटात काम देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  
असे असले तरी, सैफने चित्रपटाच्या कमी खर्चाच्या गोष्टीला साफ नकार दिला असून, गैरसमजूतीमुळे आणि योग्य समन्वयाच्या अभावामुळे असे घडले असल्याचे म्हटले आहे. आता हा सर्व घोळ संपुष्टात आला असून लवकरच मिशिगन मध्ये चित्रकरणाला सुरुवात होणार असल्याचेही सैफने स्पष्ट केले आहे. 

Story img Loader