सैफ अली खानबरोबर लग्नानंतर माझ्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नसून, सैफही अगदी पूर्वीसारखाच आहे, ही प्रतिक्रिया आहे अभिनेत्री आणि सैफची पत्नी करिना कपूर हिची. बॉलिवूडमध्ये सैफ आणि करिनाच्या लग्नाबद्दल खूप चर्चा झाली होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ते दोघेही विवाहबंधनात अडकले. त्याआधी पाच वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
सैफ आणि मी दोघेही एकमेकांच्या प्रेमात होतो. त्यामुळेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आमच्या आयुष्यात विशेष असा कोणताही बदल झालेला नाही. लग्नापूर्वी आमच्या दोघांमध्ये ज्या स्वरुपाचे नाते निर्माण झाले होते. त्याच पद्धतीचं नाते आजही कायम आहे. सर्वकाही अतिशय उत्तमपणे सुरू आहे. लग्नानंतर सैफमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि पुढील काळातही तो बदलेल असे वाटत नाही, असे करिना कपूर म्हणाली…(उर्वरित वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
आमचे लग्न ही माध्यमांसाठी खूप मोठी घटना आहे. पण वास्तविक आयुष्यात तसे काही नाही. लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाला, असे विचारल्यावर मला खूप आश्चर्य वाटते. या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे मला खरंच समजत नाही, असे करिना म्हणाली. सैफ सध्या अमेरिकेमध्ये आहे. आम्ही दोघेही माध्यमांच्या या प्रश्नावर सतत बोलतो, असेही तिने सांगितले.
करिना म्हणाली, लहानपणापासून मी अतिशय जबाबदारीने वागत आली आहे. सुरुवातीला कुटुंबाची जबाबदारी होती. आईकडे बघायला लागायचे. नंतर बहिण करिश्माकडे लक्ष द्यायला लागले आणि आता सैफची जबाबदारी माझ्यावर आहे. पण, सैफ खूपच स्वावलंबी आहे. तो अतिशय जबाबदारीने वागतो.

Story img Loader