सैफची दोन्ही मुले सारा आणि इब्राहिम यांच्याशी आपले खूप चांगले संबंध असल्याचे स्वतः करिनाने सांगितले आहे. त्या दोघांची मी एक चागली मैत्रीण असल्याचेही ती म्हणाली.
करिना आणि सैफने २०१२ साली लग्न केले. त्यापूर्वी, अमृता सिंह या त्याच्या पहिल्या बायकोपासून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. या दोघांशी आपले संबंध तसेच आहेत, जसे असायला हवेत. आमच्यात जवळीक आहे आणि आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत, असे करीना म्हणाली.
सैफ-करिनाच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. सैफ एक अद्भूत अभिनेता आहे आणि चित्रपटांच्या त्याच्या निवडीकरता तो ओळखला जातो. त्याने कधीच स्वतःला सुरक्षित ठेवून चित्रपटांची निवड न करता वेगवेगळ्या भूमिका करण्यावर लक्ष्य दिले आहे. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे मी त्याच्यावर भाळले आहे, असे करिना म्हणाली.

Story img Loader