दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना चित्रपटांवर अनावश्यक टिप्पणी करणं टाळा, असा सल्ला दिला होता. ‘पठाण’ चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून चांगलाच वाद झाला होता. त्यावर अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर मोदींनी भाजपा नेत्यांना हा सल्ला दिला होता. अशातच आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ‘माघ मेळा’ला उपस्थित असलेल्या संतांनी हिंदू देवी-देवतांची बदनामी रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ स्थापन केला आहे. चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान होऊ नये, यावर धर्म सेन्सॉर बोर्ड लक्ष ठेवणार आहे.

“माझी मुलगी कोणत्याही…” सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला प्रियांका चोप्राचं सडेतोड उत्तर

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती या १० सदस्यीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख असतील. नियुक्तीनंतर बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, “चित्रपट आणि इतर मनोरंजनाच्या कंटेंटमध्ये हिंदूंच्या संस्कृतीचा अपमान आणि हिंदू देवतांची बदनामी होणार नाही, यावर धर्म सेन्सॉर बोर्ड लक्ष ठेवेल. जर कोणताही चित्रपट किंवा वेब सीरीज हिंदू देवतांचा अपमान करत असल्याचं आढळल्यास तो चित्रपट आणि सीरिजची निर्मिती तसेच प्रदर्शन थांबवलं जाईल. लोकप्रियतेसाठी सनातन संस्कृतीचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी दिला.

प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून लग्न केलेलं अन् पती निघाला विवाहीत; अफेअरला कंटाळून घटस्फोट दिल्यानंतर पोलिसांनी…

“आमचे तज्ज्ञ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाहतील आणि जर आम्हाला तो सनातन धर्माशी संबंधित लोकांसाठी योग्य वाटला तर आम्ही त्याबद्दलचं प्रमाणपत्र देऊ. सध्या, सरकारने स्थापन केलेल्या सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या चित्रपटांमध्ये लोकांच्या भावना दुखावणारी अनेक दृश्ये आढळतात. सेन्सॉर बोर्डात धार्मिक व्यक्तीचा समावेश करण्याची मागणी आम्ही वारंवार केली आहे पण ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळेच आम्ही आमचे स्वतःचे सेन्सॉर बोर्ड स्थापन केले आहे,” असंही ते म्हणाले.

Video: घरातील श्वानाने आणल्या अनंत-राधिकाच्या अंगठ्या; तर, अंबानी कुटुंबाने रणबीर आलियाच्या ‘देवा-देवा’ गाण्यावर धरला ठेका

धर्म सेन्सॉर बोर्ड येत्या काळात मनोरंजन क्षेत्रातील लोकांची भेट घेणार आहे आणि चित्रपट आणि इतर माध्यमांमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Story img Loader