बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू यांचा आज (२३ ऑगस्ट) ६९ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलेल्या सायरा बानू या बॉलिवूडमधील ‘ब्युटी क्वीन अभिनेत्री’ म्हणून ओळखल्या जातात. सायरा यांनी त्यांचे शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले आणि वयाच्या १६व्या वर्षी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले . त्यानंतर त्यांनी धमेंद्र, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी यांच्यासोबतही काम केले. पण, त्यांना एक सुपरस्टार म्हणून स्थान फक्त क्लासिक विनोदी ‘पडोसन’ चित्रपटाने  मिळाले. सायरा बानू या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. सायरा बानू या अनेक सिनेमातून एक सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांची फार मोठी कारकीर्द नाही पण त्या अतिशय चांगल्या अभिनेत्री म्हणून आजही ओळखल्या जातात.
सायरा बानू यांना एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायचे होते. वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले. आज ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असून दिवसेंदिवस या दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होत गेले. आजही हे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन आहेत. सायरा बानूंचे सौंदर्य आणि जादू आजही बऱ्याच जणांच्या मनात घर करून आहेत. सायरा बानू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Story img Loader