बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे लाखो चाहते आहेत. दिलीप कुमार यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दिलीप कुमार साब यांची तब्येत आता बरी आहे. त्यांना उद्या रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार आहे,” असे सायरा बानो म्हणाल्या. याचा अर्थ आज दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळणार आहे. करोनाची लागण झाल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मात्र, ९८ वर्षाचे दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भारतावर असलेल्या करोनाचे संकट पाहता, ९८वर्षांच्या दिलीप कुमार यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले. तर सायरा बानो यांनी या संकट काळात अनेक गरजूंना मदत केली. सोबतच सायरा बानो यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नव्हता.